पवन खेरांना सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिलासा : जामिनावर सुटका करण्याचे निर्देश | पुढारी

पवन खेरांना सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिलासा : जामिनावर सुटका करण्याचे निर्देश

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते पवन खेरा यांना आज सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलासा दिला. त्‍यांची  अंतरिम जामिनावर सुटका करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने द्वारका न्यायालयाला दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्‍यावर टीका केल्‍या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेस प्रवक्‍ता पवन खेरांना अटक केली होती. यानंतर काही तासांमध्‍येच सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍यांना अंतरिम जामीन मंजूर करण्‍याचे आदेश दिले.  या प्रकरणी तीन ठिकाणी दाखल झालेल्‍या गुन्‍हे एकत्रीत करण्‍यात यावेत, असेही न्यायालयाने स्पष्‍ट केले.

खेरांवर दाखल करण्‍यात आलेले गुन्‍हे रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसच्‍या वतीने करण्‍यात आली होती. मात्र
न्‍यायालयाने याला नकार दिला आहे. याप्रकरणी पवन खेरांवरील आरोप सिद्ध झाल्‍यास त्‍यांना ३ ते ५ वर्ष शिक्षा होवू शकते.

Back to top button