मुलीच्या लग्नाचे वयही २१ करण्याची याचिका फेटाळली | पुढारी

मुलीच्या लग्नाचे वयही २१ करण्याची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुला-मुलींच्या लग्नाचे वय एकसमान करावे, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा व न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठापुढे या विषयी सुनावणी झाली.

मुला-मुलींच्या लग्नाच्या वयातील अंतर (मुलांसाठी २१ व मुलींसाठी १८ वर्षे ) योग्य नाही. यामुळे संविधानातील अनुच्छेद १४, १५ व २१ चे उल्लंघन होते. त्यामुळे मुलींच्याही लग्नाचे वय मुलांप्रमाणेच २१ वर्षे करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत केला होता. तथापि, न्यायालयाने तो फेटाळून लावला. हे काम न्यायालयाचे नाही. यासंदर्भात कोणता कायदा बनवायचा हे संसदेला सांगा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

संसदही संविधानाची संरक्षक आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नाचे वय या विषयावर संसद कायदा करू शकते.
– धनंजय चंद्रचूड, देशाचे सरन्यायाधीश

Back to top button