पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘आदि महोत्सव’चे उद्घाटन | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘आदि महोत्सव’चे उद्घाटन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये ‘आदि महोत्सव’चे उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांना यावेळी पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृती, शिल्पकला, खाद्य संस्कृती, वाणिज्य तसेच पारंपरिक कलेचे प्रदर्शन केले जाईल.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आदि महोत्सव विकास तसेच वारसा विचारांना अधिक जिवंत बनवत आहेत. आदिवासी समाजाचे हित माझे वैयक्तिक संबंध आणि भावनांचा विषय आहे. जागतिक व्यासपीठावर भारत आदिवासी परंपरेला आपला वारसा आणि गौरव स्वरूपात सादर करीत आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा सामना करायचा असेल तर आदिवासींच्या परंपरेतच त्यावरील मार्ग सापडेल.

Back to top button