पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील आदिवासी समाज स्वत:ला मुख्य प्रवाहापासून दूर समजत होता. आता केंद्र सरकारला त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडेत आहे. देशातील आदिवासी समाजाचा विकास माझ्यासाठी व्यक्तिगत नातेसंबंध आणि भावनांचा विषय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये 'आदी महोत्सव' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आदी महोत्सव कार्यक्रमात आदिवासी बांधावांची संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपारिक कलेचे प्रदर्शन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी कुटुंबासोबत अनेक आठवडे घालवले आहेत. मी आदिवासी बांधवाच्या परंपरा जवळून पाहिल्या आहेत. मी त्यांच्याकडून शिकलो आहे. आदिवासी जीवनशैलीने मला देशाचा वारसा आणि परंपरांबद्दल खूप काही शिकवले आहे.
आज भारत आदिवासी परंपरेला आपला वारसा आणि जागतिक व्यासपीठावर अभिमान म्हणून सादर करतो. आज भारत जगाला सांगतो की जर तुम्हाला हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या आव्हानांवर उपाय हवा असेल तर आमच्या आदिवासींच्या जीवन परंपरेकडे पहा… तुम्हाला मार्ग सापडेल, आदिवासींची जीवन पंरपरा ही पर्यावरणासाठी लाभदायक आहे, असेही त्यांनी पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
आदिवासी तरुणांना भाषेच्या अडथळ्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, परंतु आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पर्यायही खुला करण्यात आला आहे. आता आमची आदिवासी मुले, आदिवासी तरुण त्यांच्याच भाषेत शिक्षण घेऊन पुढे जातील, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.