शास्त्रज्ञांनी वर्तविली भारतातही भूकंपाची शक्यता | पुढारी

शास्त्रज्ञांनी वर्तविली भारतातही भूकंपाची शक्यता

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  नेदरलँडचे भूगर्भ संशोधक फ्रँक हॉगरबीटस् यांनी आज नाही तर उद्या, लवकरच तुर्कीत 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप होईल, असे भाकीत एका ट्विटद्वारे 4 फेब्रुवारी 2023 रोजीच वर्तविले होते. आता तुर्कीवर या भाकिताकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. फ्रँक यांच्या या ट्विटनंतर दोन दिवसांनीच 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता तुर्की आणि सीरियात 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हाहाकार केला. फ्रँक यांनीच आता भारताबाबतही असाच दावा केला आहे.

त्यांनी तसा एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात येत्या काही दिवसांत आशियातील विविध भागांत भूगर्भातील हालचाली वाढतील. अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे हिंद महासागराच्या पश्चिमेकडे ही हालचाल सरकेल. भारताचाही त्यात अर्थातच समावेश असेल. येत्या काही दिवसांत चीनमध्ये भूकंप येऊ शकतो, असेही फ्रँक यांनी म्हटले आहे; पण भूकंपाची तीव्रता अगर तारीख नमूद केलेली नाही.

तज्ज्ञ असहमत

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते भूकंपाबाबत अंदाज वर्तवणे अद्याप मानवाच्या टप्प्यात आलेले नाही. पृथ्वीतून होणार्‍या रेडॉन वायूच्या उत्सर्जनाचा थोडाबहुत संबंध भूकंपाशी असू शकतो, असे आम्हाला वाटते, असेही या फोरमचे म्हणणे आहे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या मते भूकंपाचा अंदाज वर्तविता येणे शक्य नाही. 1970 आणि 1980 च्या दशकात, संशोधकांनी प्राण्यांचे वर्तन, रेडॉन वायू उत्सर्जन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल भूकंपाचे संकेत असू शकतात.

Back to top button