मी तुमच्या परिवारातील एक सदस्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

मी तुमच्या परिवारातील एक सदस्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : तम्ही बनवलेली डॉक्युमेंट्री बघितली. त्याबद्दल माझी एक तक्रार आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये वारंवार माझा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. इथ आल्यानंतर कुटुंबात आल्यासारखे वाटले. वेळेनुसार बोहरी समुदायाने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मरोळ येथे दाऊदी बोहरा समाजाच्या अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी बोहरा समाजाशी गेल्या ४ पिढ्यांपासून जोडला गेलो आहे. परदेशात गेल्यानंतरही बोहरा समाजातील माझे बांधव भेटण्यासाठी येतात. शिक्षण क्षेत्रात, पाणी वाचवण्यात या समाजाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. दांडी यात्रेवेळी महात्मा गांधी यांनी तुमच्या घरी मुक्काम केला होता. बोहरा समाजाने भारताप्रती नेहमीच प्रेम दाखवले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दाऊदी बोहरा समाज विशेष योगदान देईल, अशी आशा आहे.

समाजाच्या अल्जामिया-तुस-सैफियाह या संस्थेचे महिलांचे शिक्षण आणि आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत विकसित होत आहे. आधुनिक शिक्षण व्यवस्था ही आपल्या देशाची प्राथमिकता आहे. २००४ ते २०१४ दरम्यान १४५ मेडिकॉल कॉलेजला सुरुवात झाली. तर २०१४ ते आजपर्यंत २६६ मेडिकल कॉलेजेसची निर्मिती करण्यात आले आहे. शिक्षणात स्थानिक भाषेला महत्व देणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे. शिक्षण आणि उद्योगांचा जवळचा संबंध असतो. बोहरा समाजातील उद्योगांमध्ये सक्रीय आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button