Turkey Earthquake : भूकंपातील मृतांची संख्या 15 हजारांवर…WHO च्या मते हा आकडा 23 हजारांवर जाऊ शकतो

Turkey Earthquake
Turkey Earthquake
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क :  तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवलेल्या सोमवारच्या विनाशकारी भूकंपानंतर मृतांची संख्या किमान 15,383 वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपातील बळींची संख्या आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा २३ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे.

तुर्कीच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीच्या माहितीनुसार, तुर्कीमधील मृतांची संख्या काही तासांत 3,000 हून अधिक झाली आणि आता 12,391 वर पोहोचली आहे.

"व्हाइट हेल्मेट" सिव्हिल डिफेन्स ग्रुपच्या म्हणण्यानुसार, सीरियातील मृतांची एकूण संख्या किमान 2,992 आहे. ज्यात वायव्येकडील बंडखोरांच्या ताब्यातील 1,730 लोकांचा समावेश आहे, तसेच सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागांमध्ये अतिरिक्त 1,262 मृत्यू आहेत.

पहिल्या तीन मोठ्या धक्क्यांनंतर आतापर्यंत जवळपास २४३ धक्के (आफ्टरशॉक्स) बसले आहेत. आफ्टरशॉक बंद होत नसल्याने बचावकार्यात मोठा अडथळा येत आहे. दोन्ही देशांत मिळून इमारतींच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत एकूण ७,९२६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही देशांतील जखमींची संख्याही ३७ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.

तुर्कीमध्ये ५,८९४ लोकांचा मृत्यू झाला असून, ३४ हजार ८१० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीरियामध्ये १,७१२ लोकांचा मृत्यू झाला असून, २ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपग्रस्त देशांच्या मदतीसाठी ७० हून अधिक देश समोर आले आहेत.

आजवरच्या भौगोलिक स्थानावरून सरकला देश

भूकंपाचा केंद्रबिंदूही तुर्कीत होता. येथील टेक्टोनिक प्लेटस् भूकंपानंतर १० फूट वर (३ मीटर) सरकल्या आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. तुर्की हा देश अॅनाटोलियन, युरेशियन आणि अरेबियन या ३ टेक्टोनिक प्लेटस्च्या मध्ये वसलेला आहे. अॅनाटोलियन आणि अरेबियन प्लेटस् परस्परांपासून २२५ कि.मी. अंतर सरकल्या आहेत. परिणामी, तुर्की हा देश आपल्या आहे. आजवरच्या भौगोलिक स्थानापासून १० फूट सरकला आहे.

मृतांचा आकडा २३ हजारांच्या पुढे ?
मृतांचा आकडा २३ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. बचाव पथकांच्या प्रयत्नांनी तुर्कीमध्ये आतापर्यंत ८ हजार लोकांना वाचवण्यात आले आहे.

७ दिवसांचा राष्ट्रीय शोक

तुर्कीमध्ये मंगळवारी सकाळी ९ च्या सुमाराला पुन्हा भूकंपाचे २ मोठे धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता ५.४ होती. नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारीही आफ्टरशॉक्स बसले. तुर्कीमध्ये ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. २०० फ्लाईटस् रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, तुर्कीत ११ हजार ३४२ इमारती कोसळल्या आहेत. तुर्कीमध्ये तीन ब्रिटिश नागरिक बेपत्ता आहेत.

बर्फवृष्टी आणि पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. आपत्कालीन सेवा दलांना बचावकार्यात खूप अडचणी येत आहेत. पाऊस, थंडी, आफ्टरशॉक्स… ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवणे म्हणजे प्रत्यक्ष काळाविरुद्ध युद्धासारखे आहे.
– सईद अल सालेह, व्हाईट हेल्मेट बचाव पथक, सीरिया

टेक्टोनिक प्लेटस्मधील बदलाने तुर्की सीरियापेक्षा ५ ते ६ मीटर (सुमारे २० फूट) जास्त खचलेले आहे, असे मला वाटते. प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती प्राप्त झाली आहे. पुढे उपग्रहीय छायाचित्रांतून अचूक माहिती उपलब्ध होईल.
– डॉ. कार्लो डोग्लिओनी, भूकंपशास्त्रज्ञ, इटली

भूक, जखमा, कडाक्याची थंडी

इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेले लोक जीव 'वाचवण्यासाठी ओरडत आहेत. केवळ भूक, जखमा आणि कडाक्याच्या थंडीमुळेही अनेक जणांना आम्ही कायमचे मुकणार आहोत, अशी वेदना बचावकार्यात सहभागी असलेल्या एका युवकाने 'रॉयटर्स'कडे बोलून दाखवली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news