Turkey Earthquake : भूकंपातील मृतांची संख्या 7926 वर पोहोचली | पुढारी

Turkey Earthquake : भूकंपातील मृतांची संख्या 7926 वर पोहोचली

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या कमीत कमी 7,926 झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेकडो कुटुंब अजूनही ढिगा-याखाली असल्याने आकडेवारीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

“व्हाइट हेल्मेट्स” म्हणून ओळखल्या जाणार्‍या सीरियन सिव्हिल डिफेन्सने मंगळवारी सांगितले की, उत्तर-पश्चिम सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात मृतांची संख्या 1,220 झाली आहे आणि जखमींची संख्या 2,600 झाली आहे.

या गटाने पुढे सांगितले की, “शेकडो कुटुंब अजूनही ढिगा-याखाली असल्याने आकडेवारीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. आमच्या टीम कठीण परिस्थितीतही शोध आणि बचाव कार्य सुरू ठेवत आहे. 400 हून अधिक कोसळलेल्या इमारती, 1,300 हून अधिक अंशतः कोसळलेल्या इमारती आणि पहाटेच्या भूकंपामुळे नुकसान झालेल्या हजारो इमारतींचे वर्णन केले आहे. सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागांमध्ये किमान 812 मृत्यूची पुष्टी झाली आहे, अशी माहिती राज्य माध्यम SANA ने दिली आहे.

हे ही वाचा :

अणू हल्ल्यासाठी चीनकडून बलूनच्या साहाय्याने चाचणी?

Turkey earthquake: ‘आई-वडिलांनी कष्टाने उभे केलेले घर त्यांच्यावरच कोसळले’, तुर्कीच्या भूकंपातील हृदय पिळवटणा-या करुण कहाण्या….

Back to top button