Stock Market Closing Bell : सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला, जाणून घ्या बाजारात आज काय घडलं | पुढारी

Stock Market Closing Bell : सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला, जाणून घ्या बाजारात आज काय घडलं

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आज सकाळी सेनेक्स निफ्टीने स्थिर सुरुवात केली. मात्र, दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार बंद होण्याच्या वेळी सेन्सेक्सने खालच्या दिशेने जात जवळपास 220 अंकांनी घसरला. तर निफ्टी देखील 100 अंकांनी खाली आला. बाजार बंद होताना 17,710 वर ट्रेड करत होता. अखेरीस NSE निफ्टी 50 43.10 पॉइंट्स म्हणजेच 0.24% घसरून 17,721.50 वर आला. तर बँक निफ्टीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहिला. बाजार बंद होताना बँक निफ्टी 100 अंकांनी वधारला.

सकाळी तब्बल 3 टक्क्यांनी घसरलेले टाटा स्टीलचे समभाग दुपारी साडेबाराच्या सुमारास 5 टक्क्यांनी वधारले. तर अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्सही वधारले. मात्र अदानी पोर्ट्सचे एकूण नफा 12 टक्क्यांनी कमी झाला तर स्टॉक फक्त 2 टक्क्यांनी वधारले. तर अंबुजा सिमेंटने चांगली कामगिरी करत अंबुजा सिमेंटचे समक्षाग 2 टक्क्यांनी वधारले. Stock Market Closing Bell

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आरबीआयच्या पतधोरण निर्णयाकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज मंगळवारी स्थिर पातळीवर सुरुवात केली. सेन्सेक्स १२८ अंकांच्या वाढीसह ६०,६३५ वर तर निफ्टी १७,८०० वर खुला झाला. सकाळच्या सत्रात सुरुवातीच्या व्यवहारात येस बँक, अदानी पोर्टस्, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स हे वधारले होते. Stock Market Closing Bell

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घसरण झालेल्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सकाळच्या सत्रात सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर हे शेअर ५ टक्क्यांपर्यंत घसरले. सकाळी टाटा स्टीलचा शेअर ३ टक्क्यांनी खाली आला. व्होडाफोन आयडियाचा शेअरही ०.६१ टक्क्याने घसरला आहे.

सकाळी चांगली सुरुवात करणा-या अदानी एंटरप्रायजेसचे शेअर दुपारी साडेबाराच्या सुमारास तब्बल 25 टक्क्यांनी वर आले. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग आज 25% वाढले आणि बीएसईवर 1965.50 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 5% वाढून 1324.45 रुपयांपर्यंत वरच्या सर्किटमध्ये बंद झाले. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स 6.35% वाढून 580.70 रुपयांवर पोहोचले, आज नंतरच्या आर्थिक तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी. अदानी ग्रीनचे शेअर्स 2.75% वाढून 912.00 रुपये झाले; अदानी विल्मर शेअर्स 5% वाढून 399.40 रुपये झाले; अदानी पॉवर लिमिटेड 2% घसरून रु. 178.80 वर; आणि अदानी टोटल गॅस 5% घसरून रु. 1467.50 वर आला. याशिवाय अंबुजा सिमेंटचे शेअर्स 2 टक्क्यांनी वधारले.

आज मंगळवारी आशियाई बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक ७.३७ अंकांनी म्हणजे ०.२३ टक्के वाढून ३,२४६ वर, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ६० अंकांनी वाढून २७,७५४ वर गेला होता.

 

 

Back to top button