दिल्लीतील प्रमुख सरकारी कार्यालयांवर G20 posters लावले जाणार

दिल्लीतील प्रमुख सरकारी कार्यालयांवर G20 posters लावले जाणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-भारताला जी 20 देशांच्या संघटनेचे वर्षभरासाठी अध्यक्षपद मिळाले आहे. यानिमित्त दिल्लीतील प्रमुख सरकारी कार्यालयांवर  G20 posters लावले जाणार आहेत. याशिवाय मेट्रो रेल्वे गाड्यांमध्ये पोस्टर्स लावले जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

G20 posters : ५५ ठिकाणी २०० बैठकांचे आयोजन

गेल्या १ डिसेंबर रोजी भारताला जी-20 संघटनेचे अध्यक्षपद मिळाले. या वर्षी भारताला जी-२० देशांच्‍या संघटनेचे अध्यक्षपद मिळणे आहे, ही बाब देशासाठी गौरव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटले होते. त्या संदर्भात आता दिल्लीत ठिकठिकाणी जाहिराती केल्या जाणार आहेत. दिल्ली मेट्रो परिसर, गाड्यांच्या डब्याच्या आत तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये जी 20 अध्यक्षपदाच्या अनुषंगाने पोस्टर्स लावले जातील तर प्रमुख सरकारी बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावले जातील. अध्यक्षपद मिळाल्याच्या वर्षभराच्या काळात देशातील ५५ ठिकाणी २०० बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

जी 20 अध्यक्षपदाच्या अनुषंगाने घेण्‍यात येणारी शेवटची बैठक सप्टेंबरमध्‍ये होईल. या बैठकीचे आयोजन दिल्लीत करण्यात आले आहे. जी 20 च्या अध्यक्षपदाची जाहिरात करताना 'वसुधैव कुटुंबकम', 'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर' अशा घोषवाक्यांचा वापर केला जात आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जी 20 अध्यक्षपदाच्या अनुषंगाने लोगो आणि थीम जारी केला होता. त्याची माहितीही पोस्टर्सद्वारे दिली जाणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news