Share Market Today | सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला, अदानी समूहातील शेअर्सची घसरण थांबेना | पुढारी

Share Market Today | सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला, अदानी समूहातील शेअर्सची घसरण थांबेना

Share Market Today : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.६) सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३५ अंकांनी घसरला. तर निफ्टी १७,८०० च्या खाली आला. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही घसरण कायम राहिली. अदानी एंटरप्रायजेस (-२.९५ टक्के), अदानी टोटल गॅस (-५ टक्के), अदानी ट्रान्समिशन (-१० टक्के), अदानी ग्रीन एनर्जी (-५ टक्के), अदानी पॉवर (-५ टक्के), अदानी विल्मर (-५ टक्के) हे अदानी समूहातील शेअर्स लोअर सर्किट्समध्ये व्यवहार करत आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात व्होडाफोन आयडिया (९.४९ टक्के), येस बँक (०.६१ टक्के), स्टेट बँक ऑफ इंडिया (०.९२ टक्के), बँक ऑफ बडोदा (१.३१ टक्के) हे शेअर्स ‍वधारले होते. (Share Market Today)

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जानेवारीमध्ये २८८.५२ अब्ज रुपये (३.५१ अब्ज डॉलर) किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button