नाणी जमा करून ‘तो’ झाला श्रीमंत; मिळतेय हजारपट किंमत | पुढारी

नाणी जमा करून 'तो' झाला श्रीमंत; मिळतेय हजारपट किंमत

लंडन : एखादी व्यक्ती किती पैसे कमावते यापेक्षा ती किती पैसे वाचवते हे महत्त्वाचे असते असे म्हटले जाते. पण कोणी केवळ नाणी वाचवून श्रीमंत झाल्याचे तुम्हाला सांगितले तर ती कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण ब्रिटनमध्ये अशी घटना घडली आहे. मॅथ्यू नावाच्या एका व्यक्तीने दहा वर्षे नाणी साठवली. ती विकून तो आता श्रीमंत झाला आहे.

मॅथ्यूने दहा वर्षांपूर्वी नाणी जमा करण्याचा निर्णय घेतला. दीर्घकाळ नाणी साठवू शकेल अशा एका पिगी बँकेत त्याने नाणी साठवण्यास सुरुवात केली. तब्बल दहा वर्षे तो या पिगी बँकेत नाणी टाकत राहिला. दहा वर्षांनंतर नाणी विकायला गेल्यानंतर त्याला त्याची हजारपट किंमत मिळत आहे. त्याच्याकडील काही दुर्मीळ नाण्यांनाही चांगली किंमत मिळत आहे.

Back to top button