Nitin Gupta : नव्या कर व्यवस्थेचा होणार जास्तीत जास्त करदात्यांना फायदा: सीबीडीटी चेअरमन नीतीन गुप्ता | पुढारी

Nitin Gupta : नव्या कर व्यवस्थेचा होणार जास्तीत जास्त करदात्यांना फायदा: सीबीडीटी चेअरमन नीतीन गुप्ता

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : प्राप्तीकरासंदर्भात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या व्यवस्थेचा जास्तीत जास्त करदात्यांना फायदा होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नीतीन गुप्ता यांनी आज ( दि. २ ) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Nitin Gupta)

कर व्यवस्थेतील डिडक्शन अर्थात कपात आणि सवलत देण्याची प्रथा हळूहळू बंद करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगून गुप्ता पुढे म्हणाले की, प्राप्तीकर कमी केला जावा, ही वैयकि्तक करदात्यांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. ती मागणी अर्थसंकल्पातील तरतुदीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन कर व्यवस्था करदात्यांच्या दृष्टीने जास्त आकर्षक आहे. तसेच मध्यमवर्गियांना निशि्चतपणे या करप्रणालीचा लाभ होणार आहे.

करदात्यांना दिलासा देण्यासाठी दोन वर्षांआधीच कर व्यवस्थेत महत्त्‍वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे त्याचा पुरेसा लाभ करदात्यांपर्यंत पोहोचला नव्हता. आता कराचे स्लॅब कमी करुन जास्तीत जास्त करदात्यांपर्यंत हा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही गुप्ता यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button