Avalanche : काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन, दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू, 21 जणांची सुटका | पुढारी

Avalanche : काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन, दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू, 21 जणांची सुटका

पुढारी ऑनलाइन डेस्क : काश्मीरमध्ये हिमस्खलन Avalanche होऊन विश्व प्रसिद्ध स्कीइंग रिसॉर्ट हिमस्खलनाच्या विळख्यात सापडल्याने दोन विदेशी स्कीयर्सचा मृत्यू झाला आहे. तर 19 स्कीयर्ससह अन्य दोन स्थानिक गाइडला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

जम्मू काश्मीर पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गुलमर्ग येथे हापतखुड, कांगडोरी येथे झालेल्या हिमस्खलनात Avalanche येथील विश्व प्रसिद्ध स्कीइंग रिसॉर्टमध्ये अनेक स्कीयर्स आणि नागरिक अडकल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच बारामुल्ला पोलिसांनी सेना आणि पर्यटन विभागासह जेकेपी संयुक्त बचाव टीम यांना माहिती देऊन बचावकार्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यात 19 विदेशी नागरिक आणि दोन स्थानीय गाइडला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मात्र, दूर्घटनेत दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नागरिक हे पोलंडचे रहिवासी असून कॉजिलटॉफ (वय 43) आणि एडम ग्रेच (वय 45) अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही पोलिश नागरिकांचा हिमस्खलनात मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. Avalanche

तर रशियाचे एकतेरिना, मॅक्सिम, व्लादिमीर, व्हॅसिली, इंजिन, लिओ, निकिता मास्ट्र्युकोव्ह, अण्णा चोर्न्याक आणि पोलंडचे रफत काकमारेन, नार्सिन विकलेक, युकाझ पोटाझेवेक, तुकाज पासेक, काटार्झिना फिलिप, मार्सिन राइझ्झिक, बार्सिन राईजिक, बार्सिको, बार्सिकोन, बार्सिझन फिलीप आदी याशिवाय पोलंडमधील बार्टोस हा परदेशी मार्गदर्शक आणि तंगमार्ग येथील 2 स्थानिक मार्गदर्शक फयाज अहमद शेख आणि मुश्ताक अहमद मीर अशी बचाव कार्यातून सुरक्षित बाहेर काढलेल्यांची नावे आहेत. Avalanche

हे ही वाचा :

पुणे : ‘नासा’च्या नावाने 6 कोटींना गंडा ; ‘राईस पुलर’च्या नावाने फसवणूक

Landslide : जोशीमठ पाठोपाठ उत्तरकाशी, ऋषिकेश, नैनिताल मसूरी येथेही भूस्खलनाचा धोका

Back to top button