आध्यात्मिक चिंतन… विराट-अनुष्‍काने दिली ऋषिकेशमधील स्वामी दयानंद गिरी आश्रमाला भेट | पुढारी

आध्यात्मिक चिंतन... विराट-अनुष्‍काने दिली ऋषिकेशमधील स्वामी दयानंद गिरी आश्रमाला भेट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिके आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली विश्रांती घेत आहे. विराट आणि त्‍याची पत्‍नी अनुष्‍का शर्मा यांनी ऋषिकेशमधील स्वामी दयानंद गिरी आश्रमाला भेट दिली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहे. एका फोटोमध्‍ये अनुष्‍का आणि विराट हे आश्रमात पूजा करताना दिसत आहेत. ( Virat and  Anushka in Rishikesh )

आश्रमात पूजा, आरतीमध्ये होणार सहभागी

विराट आणि अनुष्का आपल्या मुलीसोबत स्वामी दयानंद गिरी यांच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आज दोघे आश्रमात पूजेसह  गंगा घाटावरील आरतीमध्येही सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारताच्या चांगल्या कामगिरीबद्दल आशीर्वाद घेतले. यापूर्वी विराट आणि अनुष्‍का त्‍यांची मुलगी वामिकासह वृंदावन येथील एका आश्रमात पूजा केली होती.  ( Virat and  Anushka in Rishikesh )

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील अव्वल दोन स्थान निश्चित करण्यासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. जूनमध्ये ओव्हल येथे होणार्‍या कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात स्थान मिळवण्‍यासाठी भारतीय संघाला सरस कामगिरी करावी लागणार आहे.  या मालिकेची सुरुवात ९ फेब्रुवारीपासून होणार आहे.

स्वामी दयानंद गिरी पंतप्रधान मोदींचे गुरू

स्वामी दयानंद गिरी यांनी 1960 च्या दशकात ऋषिकेश येथे आश्रमाची स्थापना केली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू आहेत. स्वामी दयानंद गिरी यांचे सप्टेंबर 2015 मध्ये निधन झाले.स्‍वामी दयानंद गिरी यांची भेट घेण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्रमाला भेट दिली होती. यानंतर हा आश्रम चर्चेत आला होता. स्वामी दयानंद गिरी हे ऋषिकेशमधील दयानंद सरस्वती आश्रम आणि कोईम्बतूरमधील अर्शा विद्या गुरुकुलममध्ये  वेद आणि संस्कृतचे शिक्षक होते. त्यांनी सुमारे 50 वर्षे देश-विदेशात वेदांताचे अध्यापन केले. संयुक्त राष्ट्राने २००५ मध्‍ये पुरस्‍कार देवून स्वामी दयानंद गिरी यांच्‍या कार्याचा गौरव केला होता.

हेही वाचा :

 

Back to top button