

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकशाही आमच्या नसानसांत असून भारतीय म्हणून या लोकशाहीचा अभिमान आहे. देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वर्षातील पहिल्याच 'मन की बात' कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन भारताचा उल्लेख केला. तसेच प्रजासत्ताक दिनातील अनेक पैलूंवर यावेळी प्रकाश टाकला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आदिवासी समाजासाठी काम करणार्यांना पद्य पुरस्कार मिळाले आहेत. टोटो, हो, कुई, कुव्ही आणि मंडा यासारख्या आदिवासी भाषांवर काम करणार्या अनेक मान्यवरांना पद्य पुरस्कार मिळाला आहे. भारत जगातील सर्वाधिक मोठा लोकशाही देश आहे. त्याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. सध्या जगभरात तापमान वाढ आणि जैव विविधतेच्या संरक्षणाबाबत खूप चर्चा केली जाते. त्या दिशेने भारताकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रातील अलिबाग नजीकच्या केनाड गावातील शर्मिला ओसवाल यांनी गेल्या 20 वर्षांपासून बाजरी विविध जाती शोधण्यात अमूल्य योगदान दिले आहे. त्या शेतकर्यांना कौशल्यपूर्ण शेतीचे प्रशिक्षण देत आहे. ओसवाल यांच्या प्रयत्नामुळे बाजरीच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले.