दिल्ली: 'बीबीसी'च्या कार्यालयाबाहेर हिंदू सेनेने लावले निषेधाचे फलक | पुढारी

दिल्ली: 'बीबीसी'च्या कार्यालयाबाहेर हिंदू सेनेने लावले निषेधाचे फलक

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : गुजरात दंगलीसंदर्भात बीबीसीने तयार केलेल्या लघुपटावरील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  येथील के. जी. मार्गावरील बीबीसीच्या कार्यालयासमोर फलक लावून हिंदू सेना संघटनेने आज (दि.२९) निषेध व्यक्त केला.

‘बीबीसी’ देशाच्या एकतेसाठी धोकादायक बनली आहे, ‘बीबीसी भारत छोडो’, ‘बीबीसीवर बंदी घाला’, ‘भारताची प्रतिमा मलिन करणे थांबवा’, अशा आशयाचे फलक हिंदू सेनेने बीबीसीच्या कार्यालयासमोर लावले होते. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक नंतर पोलिसांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचून त्यानुसार बीबीसी काम करीत असल्याचा आरोप हिंदू सेनेकडून करण्यात आला आहे. बीबीसी संस्थेवर तत्काळ बंदी घालणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी आंदोलनस्थळी दिली. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात बीबीसीवर बंदी घालण्यात आली होती. नंतर माफी मागितल्यानंतर ही बंदी उठविण्यात आली होती. बीबीसीचे कारनामे पाहता या संस्थेवर बंदी घालण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button