Fighter Jets Crash : सुखोई आणि मिराजची समोरासमोर धडक; वैमानिकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी | पुढारी

Fighter Jets Crash : सुखोई आणि मिराजची समोरासमोर धडक; वैमानिकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील मुरेनाजवळ आज (दि. २८) सकाळी दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात वैमानिकाचा मृत्य़ू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून उड्डाण केले होते. (Fighter Jets Crash)

मध्य प्रदेशमध्‍ये सुखोई आणि मिराजची समोरासमोर धडक

मध्य प्रदेशमधील मुरेनाजवळ हवाई दलाची सुखोई-३० आणि मिराज २००० या विमानांची समोरासमोर धडक झाली. हवाई सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. अपघातावेळी सुखोई-३० मध्ये 2 पायलट, मिराज २००० मध्ये एक पायलट होता. प्राथमिक माहितीनुसार  २ वैमानिक सुरक्षित असून,अजून एकाचा शोध सुरु असल्‍याचे मुरेन जिल्हाधिकाऱ्यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले होते. (Fighter Jets Crash)

राजस्थान-वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले

राजस्थानमधील भरतपूर येथे आज सकाळी हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. भरतपूरच्या उचैन पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगोरा गावाजवळ विमान कोसळले. येथील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या या लढाऊ फायटर विमानाला हवेतच आग लागली असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली आहे. या घटनेच्‍या माहितीनंतर हवाई दलाच्‍या अधिकार्‍यांनी दुर्घटनास्‍थळी धाव घेतली. (Fighter Jets Crash)

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून घटनेची माहिती

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलांच्या प्रमुखांकडून भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या अपघाताबाबत माहिती घेतली आहे. रक्षा मंत्री यांनी आयएएफ वैमानिकांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सीडीएस जनरल अनिल चौहान आणि आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या संपर्कात असून हे दोन्ही प्रमुख घटनेचा तपशिल घेत असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. (Fighter Jets Crash)

हेही वाचा :

Back to top button