आरपीएफ,आरपीएसएफ कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर  | पुढारी

आरपीएफ,आरपीएसएफ कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशिष्ट सेवेसाठी आरपीएफ, आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक (पीपीएम) आणि गुणवत्तापूर्ण सेवांसाठी पोलीस पदक (पीएम) जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त राजा राम यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाईल.
यासोबतच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) पूर्व किनारपट्टी रेल्वे चे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार, सहाय्यक कमांडंट देवराय श्रीनिवास, जमजेर कुमार, प्रवीण सिंग (निरीक्षक), विजय कुमार (निरीक्षक), दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे उपनिरीक्षक एन.श्रीनिवास राव, विवेक मोहन (उपनिरीक्षक, उत्तर रेल्वे), जे. राजेंद्रन (उपनिरीक्षक, दक्षिण रेल्वे), यावर हुसेन ( उपनिरीक्षक) दिवाकर शुक्ला (सहाय्यक निरीक्षक, उत्तर-पूर्व रेल्वे), निलेश कुमार (सहाय्यक उपनिरीक्षक, पूर्व-मध्य रेल्वे), साजी ऑगस्टीन (सहायक उपनिरीक्षक, दक्षिण रेल्वे), प्रफुल्ल भालेराव (हेड कॉन्स्टेबल, पश्चिम रेल्वे), राम साहू (आचारी) आणि छबुराव साखरजी ढवळे, (चालक,मध्य रेल्वे) यांना जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button