Oscars Announcement : RRR च्या 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट नामांकन | पुढारी

Oscars Announcement : RRR च्या 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट नामांकन

पुढारी ऑनलाईन डेस्क : RRR मधील Naatu Naatu ला ऑस्कर 2023 चा (Oscars Announcement) सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. नामांकनांची घोषणा मंगळवारी (दि. २४) करण्यात आली. RRR मधील नाटू नाटू या गाण्याला एमएम किरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण हे दोन मोठे अभिनेते या गाण्यात पाहायला मिळतात. त्यांच्या दमदार बीट्समुळे ऑस्कर पुरस्कार मिळवत मोठी कामगिरी मिळाली आहे.

यावर्षीच्या ऑस्करसाठी दोन भारतीय चित्रपटांचा समावेश झाला होता. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.  95 व्या ऑस्कर नामांकने आज जाहीर करण्यात आले. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसकडून आज या पुरस्कार सोहळ्याचे अनावरण झाले. बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया येथे आयोजित ऑस्कर पुरस्कार 2023 नामांकन करण्यात आले. त्याचे नामांकन होस्ट रिझ अहमद आणि अभिनेत्री अॅलिसन विल्यम्स यांनी केले.

भारताकडून चार चित्रपटांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. RRR, चेलो शो, द एलिफंट व्हिस्परर्स आणि ऑल दॅट ब्रेथ्स अशी या चित्रपटांची नावे होती. (Oscars Announcement)

हेही वाचा

Back to top button