

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा यांनी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी सोमवारी (दि. 23) जीवन संपवले. त्यांच्या या निर्णयाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
सुधीर वर्मा यांच्यासोबत 'कुंदनपू बोम्मा' चित्रपटात काम केलेले सुधाकर कोमकुला यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे, "तुम्हाला भेटून आणि तुमच्यासोबत काम करताना आनंद झाला! तुम्ही आता आमच्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे"
सुधीर यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांनी अचानक हे पाऊल का उचलले हे अद्याप कळलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.