ओडिशात 22 जातींचा ओबीसीमध्ये समावेश | पुढारी

ओडिशात 22 जातींचा ओबीसीमध्ये समावेश

भुवनेश्वर : ओडिशा सरकारने 22 जातींना राज्याच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचा धाडसी निर्णय शनिवारी घेतला. यामुळे या जातींना ओबीसीचे लाभ मिळणार आहेत. त्याचा बिजू जनता दलाला येत्या निवडणुकीत फायदा होईल, असा अंदाज आहे.

ओडिशाचे मुख्य सचिव सुरेश महापात्रा यांनी सांगितले की, या 22 जाती व त्यांच्यासारखीच नावे असलेल्या जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश होता. पण राज्याच्या यादीत ती नावे नव्हती. त्यामुळे त्यांचा राज्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बधेई, बिनधनी, बिंदनी, बरजी, बरोई, सखुआ तांती, गोला तांती, लाज्या निबारन, हंसी तांती, कपाडिया, गंधमाली, थनपाती, पंदरा माली, पनियार माली, कलंदी या सह एकूण 22 जातींचा आता राज्याच्या ओबीसी यादीत समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button