

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील सनसिटी हॉटेलला आज (दि.२१) सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
अधिका-यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाल्या असून काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान, जुलै 2022 मध्ये कॅनॉट प्लेसच्या बाहेरील वर्तुळातील आणखी एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. तर यापूर्वी 16 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील शकरपूर भागातील एका बहुमजली इमारतीला आग लागली होती. या इमारतीत DGHS चे कार्यालय असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?