Moscow- Goa Flight : मॉस्कोहून गोव्याला येणारे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानकडे वळवले | पुढारी

Moscow- Goa Flight : मॉस्कोहून गोव्याला येणारे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानकडे वळवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला (Moscow- Goa Flight) येणारे अझूर एअरलाइन्सचे चार्टर्ड विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. या विमानात २४० प्रवासी होते. हे विमान पहाटे ४.१५ वाजता दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अझूर एअरलाइन्सचे विमान (AZV2463) भारतीय हवाई हद्दीत (Moscow- Goa Flight) पोहोचण्यापूर्वी उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. दाबोळी विमानतळावरील अधिकाऱ्यांना 12.30 वाजता ईमेलद्वारे या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच ते विमान वळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उझबेकिस्तानमधील विमानतळावर सुरक्षितपणे हे विमान उतरविण्यात आले आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचीही माहिती समोर आली होती. या विमानात २३६ प्रवासी होते. यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, त्यानंतर बॉम्बची माहिती अफवा असल्याचे समोर आले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button