एलन मस्क यांनी एका दिवसात कमावले ३७ हजार कोटी | पुढारी

एलन मस्क यांनी एका दिवसात कमावले ३७ हजार कोटी

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क आणि ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यात जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याची कडवी शर्यत सुरूच आहे. चालू वर्षात अनेकदा दोघांनी एकमेकांना मागे टाकले; पण यावेळी मस्क जरा जास्तच पुढे निघून गेले आहेत. ब्लूमबर्गच्या जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीनुसार, आता मस्क 209 अब्ज डॉलरसह जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, तर बेझोस 198 अब्ज डॉलरसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. दोघांच्या एकूण संपत्तीत आता 11 अब्ज डॉलर्सचा फरक आहे.

एका दिवसात 5.07 अब्ज डॉलर कमाई

टेस्लाचे शेअर्स 2.75 टक्क्यांनी वधारल्याने एलन मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 5.07 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 37,422 कोटी रुपयांनी वाढ झाली. यंदा त्यांच्या संपत्तीत 39.1 अब्ज डॉलरने वाढ झाली. शेअर वधारल्याने त्यात 462 दशलक्ष डॉलरची भर पडली. वर्षभरातील ही वाढ 7.65 अब्ज डॉलरची आहे.

मार्क झुकेरबर्गनी बिल गेट्सना टाकले मागे

फ्रेंच व्यावसायिक बर्नार्ड अर्नाल्ट (162 अब्ज डॉलर) श्रीमंतांच्या यादीत तिसर्‍या स्थानी आहेत. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून चौथे स्थान मिळवले आहे. झुकेरबर्ग यांची संपत्ती 131 अब्ज डॉलर आणि गेट्स यांची संपत्ती 129 अब्ज डॉलर आहे. झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत 2.54 अब्ज डॉलरने वाढ झाली, बिल गेट्स यांच्या संपत्तीत 3.17 अब्ज डॉलरने घट झाली.

टॉप -10 मधील श्रीमंत

* इंटरनेट उद्योजक लॅरी पेज 127 अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानी
* गुगलचे सह-संस्थापक सेर्गेई ब्रिन 122 अब्ज डॉलर्ससह सातव्या स्थानी
* अमेरिकन व्यावसायिक स्टिव्ह बाल्मर 107 अब्ज डॉलर्ससह आठव्या स्थानी
* लॅरी लिसन 104 अब्ज डॉलर्ससह नवव्या
* वॉरेन बफेट 101 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दहाव्या स्थानावर
* जगातील पहिल्या 10 श्रीमंतांपैकी 9 जण अमेरिकन आहेत.

Back to top button