तीन राज्यांतील निवडणुका जाहीर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय, नागालँड या 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. त्रिपुरामध्ये 16फेब्रुवारीला, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्चला जाहीर होतील.
तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा 31 आहे. त्रिपुरात 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. मेघालय, नागालँडमध्ये 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत हा कालावधी आहे. त्रिपुरात 2 फेब्रुवारीपर्यंत, तर मेघालय-नागालँडमध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
तिन्ही राज्यांमध्ये 9 हजार 125 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तिन्ही राज्यांत 376 मतदान केंद्रे महिला कर्मचारी हाताळतील. तिन्ही राज्यांत मिळून 62.8 लाख मतदार आहेत.