जादा अपत्य जन्माला घालणार्‍या महिला कर्मचार्‍याला पगारवाढ | पुढारी

जादा अपत्य जन्माला घालणार्‍या महिला कर्मचार्‍याला पगारवाढ

गंगटोक, वृत्तसंस्था : सिक्किममध्ये आता अपत्य जन्माला घातल्यास सरकार महिला कर्मचार्‍याला पगारवाढ मिळणार आहे. राज्य सरकारने असा एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार दुसर्‍यांदा महिला कर्मचार्‍याने अपत्य जन्माला घातल्यास पगारवाढ आणि तिसर्‍या अपत्यानंतर डबल पगारवाढ मिळणार आहे. सामान्य नागरिकांनाही अधिक अपत्ये जन्माला घातल्यास अशा प्रकारची सुविधा मिळणार आहे. एक अपत्य जन्मास घालणार्‍या महिला कर्मचार्‍याला या सुविधेचा लाभ मिळणार नाही.

दुसरीकडे आयव्ही तंत्राने माता होणार्‍या महिलांना 3 लाखांची मदत केली जाणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत सिक्किममधील जननदर घटला आहे. राज्यात महिला एकाच अपत्याला जन्मास घालत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे आदिवासी समूहाच्या लोकसंख्येतही घट झाली आहे.

आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म दिल्यास 3 लाखांची मदत

सरकारने राज्यात सरकारी रुग्णालयात आयव्हीएफ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिलेला सामान्यपणे गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होत असेल तर या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. आयव्हीएफ तंत्राद्वारे आई होणार्‍या महिलेला 3 लाखांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत राज्यात आयव्हीएफ तंत्राद्वारे 38 महिला गरोदर राहिल्या आहेत, यातील काही महिलांनी अपत्ये जन्माला घातली आहेत.

Back to top button