

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील गंगासागर येथून ५०० ते ६०० यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या २ प्रवासी नौका रविवारी (दि.१५) रात्रीपासून धुके आणि भरती-ओहोटीमुळे समुद्रात अडकल्या होत्या. राज्य सरकारने यात्रेकरूंसाठी तत्काळ बचावकार्य सुरू करत मदत सामग्री पाठवली. तर भारतीय तटरक्षक दलाच्या दोन हॉवरक्राफ्ट घटनास्थळी रवाना झाले आहे.
गंगासागर येथून ५०० ते ६०० यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एकूण २ प्रवासी नौका रविवारी संध्याकाळपासून धुके आणि समुद्राच्या भरतीमुळे समुद्रात अडकल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. राज्य प्रशासनाने अडकलेल्या भाविकांसाठी मदत सामग्री पाठवली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या दोन हॉवरक्राफ्ट बचाव कार्य करत आहे.
टेलीग्राफच्या वृत्तानुसार, परिसरात दृश्यमानता कमी होती. त्यामुळे बोटीला उशीर झाला. त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर यात्रेकरूंचे आगमन होण्यास उशीर झाला होता.
हेही वाचलंत का ?