करवतीच्या सहाय्याने आफताबने केले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे; शवविच्छेदन अहवालात खुलासा | पुढारी

करवतीच्या सहाय्याने आफताबने केले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे; शवविच्छेदन अहवालात खुलासा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला याने करवतीसारख्या धारदार शस्त्राचा वापर करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले, असे शवविच्छेदनामध्ये समोर आले आहे. आफताब पूनावाला याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धा हिचा खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. त्यानंतर मृतदेहाचे ते तुकडे दिल्लीतील मेहरौली भागातील जंगलात टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे हस्तगत करून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविले होते.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्समध्ये तुकड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आला असून त्यामध्ये आफताब याने करवतीसारख्या धारदार शस्त्राचा वापर करन मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. सापडलेल्या हाडांच्या कोपऱ्यांवर कापल्याच्या अतिशय बारिक खुणा आढळून आल्या आहेत. शवविच्छेदन अहवालामुळे पोलिसांना मारेकरी आफताबविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button