खासदार मोहम्मद फैजल यांना 10 वर्षांची शिक्षा, वाचा काय आहे प्रकरण | पुढारी

खासदार मोहम्मद फैजल यांना 10 वर्षांची शिक्षा, वाचा काय आहे प्रकरण

पुढारी ऑनलाइन डेस्क : लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. न्यायालयाने याप्रकरणी एकूण 4 जणांना दोषी ठरवले असून फैजल यांच्यासह सर्व दोषींना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, खासदार फैजल यांच्यावर 2009 मध्ये पदनाथ सालिह यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका राजनैतिक मसल्याबाबत दखल देण्यासाठी गेलेल्या पदनाथ यांच्यावर फैजल आणि त्यांच्या सहका-यांनी हल्ला केला होता.

फैजल यांनी आपल्या विरोधात राजकारण करून आपल्याला फसवण्यात आल्याचे सांगत उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे सांगितले आहे.

फैजल यांच्यावर या व्यतिरिक्त 2012 मध्ये सीबीआय ने कथित टुना मासळी श्रीलंकेच्या एका कंपनीला निर्यात केल्या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. यामध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदारांचे भाच्चे अब्दुल रज्जाक आणि श्रीलंकन कंपनीला आरोपी कले होते.

लक्षद्वीप कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने स्थानिक मच्छिमारांनी पकडलेले ट्यूना मासे श्रीलंकेच्या एका फर्मला निर्यात केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदाराने केला. मात्र, त्याबदल्यात लक्षद्वीप कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला कोणतेही पेमेंट करण्यात आले नाही. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले.

हे ही वाचा :

Nashik : पत्राचाळ बेकायदेशीरच ; महापालिका ॲक्शन मोडवर, कारवाई करणार

Afghanistan | काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर आत्मघाती बॉम्बस्फोट, २० ठार, मृतांमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश

Back to top button