महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीस कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा अडसर | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीस कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा अडसर

बेळगाव/नवी दिल्ली;  पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा समावेश असल्यामुळे सुनावणी अनिश्चित झाली आहे. जोपर्यंत नवे खंडपीठ स्थापन होत नाही, तोपर्यंत सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. 11) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, त्रीसदस्यीय खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश होता. त्यामुळे आज सुनावणी झाली नाही. गुरुवारीही (दि. 12) सुनावणी लिस्टेड आहे. पण, नवे खंडपीठ स्थापन होत नाही तोपर्यंत सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या दाव्यात महाराष्ट्र किंवा कर्नाटकच्या न्यायमूर्ती यांचा खंडपीठात समावेश झाला तर, नैतिकतेच्या मुद्द्यावर सुनावणी होत नाही. याच मुद्द्यावरून सीमाप्रश्न सुनावणी अनेकदा लांबणीवर पडली आहे. याआधी 30 ऑगस्ट 2022 रोजी सीमाप्रश्नाची सुनावणी झाली होती. यावेळी कर्नाटक सरकारच्या वकिलांनी तयारीसाठी वेळ मिळाला नाही.

Back to top button