‘JEE Mains 2023’ पुढे ढकलण्याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली | पुढारी

‘JEE Mains 2023’ पुढे ढकलण्याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

मुंबई, पुढारी ऑनलाईन : जेईई मेन 2023 (JEE Mains 2023) परीक्षा पुढे ढकलण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळली.

न्यायालयाने म्हटले की, परीक्षेला उशीर झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम होईल. त्यात कोणतीही असाधारण परिस्थिती आढळत नाही. जर उमेदवाराने जेईई मेन जानेवारी 2023 च्या परीक्षेत चांगली कामगिरी केली नाही, तर तो किंवा ती त्याच्या एप्रिल सत्रात उपस्थित राहू शकते. एनटीएला अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यापासून रोखणे योग्य होणार नाही.

जेईई मेन जानेवारी सत्र नोंदणी प्रक्रिया संपायला फक्त दोन दिवस उरले

जेईई मेन जानेवारी 2023 सत्र नोंदणी प्रक्रिया संपायला फक्त दोन दिवस उरले आहेत. आजपासून दोन दिवसांनी म्हणजे 12 जानेवारी 2023 रोजी, संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी अर्ज प्रक्रिया बंद होईल. आता अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे आणि ते अद्याप करू शकले नाहीत, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि अर्जाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे. शेवटच्या तारखेनंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, असे समजते आहे.

Back to top button