धर्म परिवर्तन गंभीर मुद्दा, याला राजकीय रंग देवू नका : सर्वोच्‍च न्‍यायालय | पुढारी

धर्म परिवर्तन गंभीर मुद्दा, याला राजकीय रंग देवू नका : सर्वोच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील धर्म परिवर्तनाच्‍या ( Religious conversion ) मुद्यावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिंता व्‍यक्‍त केली आहे. हा प्रकार गंभीर असून, याला राजकीय रंग देण्‍यात येवू नये, असे निरीक्षणही नोंदवले आहे. तसेच या प्रकरणी दाखल याचिकेवर निर्णय घेण्‍यास न्‍यायालयास मदत करावी, असेही सूचना सर्वोच्‍च न्‍यायालयाने ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामानी यांना केली.

जबरदस्‍तीने होणार्‍या धर्मपरिवर्तनावर ( Religious conversion ) ठोस कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल झाली आहे. यावरील सुनावणीवेळी सर्वोच्‍च न्‍यायालयाने धर्म परिवर्तन मुद्‍यावर चिंता व्‍यक्‍त केली. तसेच याला राजकीय रंग देण्‍यात येवू नये, असे निरीक्षणही नोंदवले. तसेच या प्रकरणी दाखल याचिकेवर निर्णय घेण्‍यास न्‍यायालयास मदत करावी, असेही सूचनाही सर्वोच्‍च न्‍यायालयाने ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामानी यांना केली.

 

 

Back to top button