GDP growth : यावर्षी देशाचा जीडीपी ७ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज

GDP growth : यावर्षी देशाचा जीडीपी ७ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाचा चालू वर्ष २०२२-२३ मध्ये आर्थिक विकास दर (जीडीपी) GDP growth ७ टक्क्यांवर राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला आगाऊ अंदाज (एफएई) जारी केला आहे. उत्पादन क्षेत्राच्या कमजोर कामगिरीमुळे देशाचा चालू वर्षातील (२०२२-२३) जीडीपीत घट होण्याची शक्यता यानुसार वर्तवण्यात आली आहे. गेल्यावर्षी हा दर ८.७ टक्क्यांवर राहिला होता, हे विशेष.

चालू आर्थिक वर्षात भारताचा नॉमिनल जीडीपी ग्रोथ १५.४ टक्के (GDP growth) राहण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी हा ग्रोथ १९.५ टक्के होता. एनएसओच्या माहितीनुसार, स्थिर मुल्यावर (२०११-१२) आधारित आर्थिक विकास दर २०२२-२३ मध्ये १५७.६० लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३१ मे २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या २०२१-२२ च्या अस्थायी अनुमानामध्ये हा अंदाज १४७.३६ लाख कोटी रुपये राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

३१ मे २०२२ रोजी जाहीर झालेल्या २३६. ६५ लाख कोटी रुपयांच्या २०२१-२२ या वर्षाच्या जीडीपीच्या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत, २०२२-२३ मध्ये सद्य किमतींवर जीडीपी २७३.०८ लाख कोटी रुपये असेल असा अंदाज एनएसओने वर्तवला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news