पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवांच्या संमेलनाचे शनिवारी आयोजन | पुढारी

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवांच्या संमेलनाचे शनिवारी आयोजन

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवांच्या दुसऱ्या राष्ट्रीय संमेलनांचे नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. संमेलनातून राज्यांसोबत सहकार्यात वेग तसेच आर्थिक विकासातील सातत्य मिळवण्यासंबंधी लक्ष केंद्रित केले जाईल. उद्या, शनिवारी (दि.७) पंतप्रधान या संमेलनात सहभागी होतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हे संमेलन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल. सहकारी संघवाद, केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या माध्यमातून राज्यासोबत मिळून काम करीत नव भारताचा विकास आणि प्रगती करीता एक आवश्यक स्तंभ आहे, असा विश्वास या संमेलनानिमित्त व्यक्त केला जात आहे.

मुख्य सचिवांचे असे संमेलन पहिल्यांदा जून २०२२ मधे हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये आयोजित करण्यात आली होते. यंदा आयोजित तीन दिवसीय संमेलनात राज्यांसोबत सहकार्य वाढीस लावण्यासह सातत्यपूर्ण आर्थिक विकासावर केंद्रित केले जाईल. २०० हून अधिक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होतील. केंद्र सरकारचे प्रतिनिधी, सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होतील.

हेही वाचलंत का ? 

Back to top button