60 वर्षांपूर्वी पेट्रोल होते 72 पैसे प्रतिलिटर! | पुढारी

60 वर्षांपूर्वी पेट्रोल होते 72 पैसे प्रतिलिटर!

नवी दिल्ली : सध्याचे पेट्रोल, डिझेलचे दर पाहता साठ वर्षांपूर्वीचे दर किती होते, हे पाहणे रंजक ठरू शकते. सोशल मीडियावर सध्या 1963 मधील एका पावतीचा फोटो व्हायरल होत आहे. पेट्रोल भरल्यानंतर एका पेट्रोल पंपातून ग्राहकाला ही पावती देण्यात आली होती. पावतीवर तारीख आहे 2 फेब—ुवारी 1963. त्यामध्ये लिहिले आहे ‘पाच लिटर पेट्रोल’ आणि त्याच्यासमोर किमतीच्या रकान्यात लिहिले आहे ‘3 रुपये 60 पैसे.’ या हिशेबाने त्यावेळी एका लिटरमागे पेट्रोलची किंमत होती 72 पैसे. सध्याच्या काळात पाणीही यापेक्षा महाग मिळते.

Back to top button