डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीकरांनी रिचवले 218 कोटींचे मद्य | पुढारी

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीकरांनी रिचवले 218 कोटींचे मद्य

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मद्य विक्रीचा नवा उच्चांक गाठला. शेवटच्या आठवड्यात दिल्लीत 218 कोटी रुपयांचे मद्य विकले गेले. बाटल्यांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर तब्बल 1 कोटी बाटल्या शेवटच्या आठवड्यात विकल्या गेल्या.

नववर्ष स्वागत हा देशभर पार्ट्यांचा काळ असतो. या काळात आणि होळीच्या काळात मद्य विक्री प्रचंड असते. यंदाही तसेच झाले; पण त्यातही दिल्लीकरांनी विक्रम प्रस्थापित केला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत 1 कोटी बाटल्या मद्य विकले गेले, त्याची किंमत 218 कोटी होती. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी सर्वाधिक 45 कोटी 28 लाख रुपयांचे मद्य विकले गेले. 24 ते 31 डिसेंबर या काळातील ही आकडेवारी आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यात मद्य विक्रीतून सरकारला मिळालेल्या महसुलानेही विक्रम केला आहे. त्या एका महिन्यात सरकारच्या तिजोरीत 560 कोटी रुपयांची भर पडली.

Back to top button