kanjhawala Delhi Road Horror : त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार नाहीत, अपघात हेच मृत्यूच कारण | पुढारी

kanjhawala Delhi Road Horror : त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार नाहीत, अपघात हेच मृत्यूच कारण

अपघातावेळी मैत्रिणही होती सोबत | Kanjhawala Delhi Road Horror

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : वेगवान कारने तब्बल १३ किलोमीटर फरफटत नेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचा शवविच्छेदन अहवाल उपलब्ध झाला आहे. या अहवालानुसार संबंधित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. जोराचा आघात हे मृत्यूचे कारण असल्याचे पुढे आले आहे. (kanjhawala Delhi Road Horror)

डॉ. मौलाना आझाद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपासासाठी स्वॅब आणि मृत तरुणीच्या जीन्सचे तुकडे संरक्षित करण्यात आले आहेत. मृत तरुणीचे नाव अंजली सिंग असे आहे. या तरुणीची आईने मृत्यूचे कारण फक्त अपघात नसावी, असा संशय व्यक्त केला होता. प्राथमिक अहवालानुसार आघातामुळे डोक्यात रक्तस्राव, तसेच मज्जारज्जू, दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अपघातावेळी होती आणखी एक तरुणी (kanjhawala Delhi Road Horror)

दिल्लीतील सुलतानपूर येथील कांजवाला परिसरात हा अपघात झाला. दिल्‍ली पोलिसांनी सांगितले की, ” सुलतानपूर येथील कांजवाला परिसरात अपघातात ठार झालेल्‍या तरुणीने प्रवास केलेल्‍या रस्‍त्‍यावरील सीसीटीव्‍ही फुटेज तपासण्‍यात आले. यामध्‍ये अपघातग्रस्‍त तरुणीबरोबर आणखी एक युवती असल्‍याचे निदर्शनास आले. कारने धडक दिल्‍यानंतर मागे बसलेली तरुणीला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर किरकोळ दुखापत झालेली तरुणी आपल्‍या घरी गेली.” तर अंजली सिंग हिचा पाय कारमध्ये अडकल्याने ती कारसोबत फरफटत गेली.

संबंधित तरुणीचा जबाब नोंदवला (kanjhawala Delhi Road Horror)

याबाबत आज ( दि. २) पत्रकार परिषदेत माहिती देताना तपास अधिकारी पोलीस अधीक्षक सागर हुड्‍डा यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्‍य साक्षीदार ही युवतीच आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. तपास अद्‍याप प्राथमिक टप्‍प्‍यावर आहे.

विवस्‍त्र अवस्‍थेतील मृतदेह रस्‍त्‍याच्‍या कडेला फेकला

पाच आरोपींनी कांजवाला रस्त्यावरील जोंटी गावाजवळ कार थांबवली. त्यांना तरुणीचा मृतदेह कारखाली अडकल्‍याचा दिसला. तरुणीचा मृत्‍यू झाला होता. तिच्‍या अंगावरील सर्व कपडे फाटले होते. आरोपी तरुणांनी विवस्‍त्र अवस्‍थेतील तरुणीचा मृतदेह रस्‍त्‍याच्‍या कडेला फेकून दिला. या प्रकरणातील आरोपी अमित आणि दीपक खूप दारू प्यायली होती. किशन विहारमध्ये त्याने स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली. भीतीपोटी ते घटनास्थळावरून पळून गेले होते.  धडक दिल्‍यानंतर तरुणी कारखाली अडकल्याचे दिसले नाही, अशी कबुली आरोपींनी जबाबात दिली आहे.

गृहमंत्रालयाने घेतली गंभीर दखल, अहवाल मागवला

या भीषण अपघाताची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी विशेष पोलिस आयुक्त शालिनी सिंह यांच्या नेतृत्त्‍वाखाली एक विशेष पथकाची स्‍थापना केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिस लवकरच दिल्ली पोलिसांना अहवाल देणार आहेत. कारच्या चेसिसमध्ये बरेच रक्त आणि त्वचा आढळून आली होती. रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (एफएसएल) आरोपीच्या कारची तपासणी केली आहे. कारच्या चेसिसमध्ये ड्रायव्हरच्या पुढील सीटपर्यंत कारच्या खाली रक्त आढळले आहे. कारखाली भरपूर रक्त सापडले आहे. एफएसएल अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कारच्या अंडरबॉडी पार्ट्सखाली अडकली होती. कारमधून बिडी आणि सिगारेट सापडल्या आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button