नववर्षात १० कोटींवर ५ जी फोनची विक्री होणार

5G phone
5G phone
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नव्या वर्षात ४ जीच्या तुलनेत ५ जी स्मार्टफोनची विक्री वाढेल, हे ठरल्यात जमा आहे. एप्रिल- जून तिमाहीत देशात १० कोटींहून जास्त ५ जी फोनची विक्री होईल, असे मानले जात आहे. काऊंटरपॉईंट या संस्थेच्या अहवालानुसार २०२३ अखेरीस ४ जीच्या तुलनेत ५ जी हँडसेटची जास्त विक्री होईल. दुसरीकडे टेलिकॉम कंपन्याही आपापले दर वाढवण्याची तयारी करत आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर या अत्याधुनिक नेटवर्कचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. लवकरच बाजारात आणखी स्वस्त ५ जी स्मार्टफोन उपलब्ध होतील.

५ जीत १.५ लाख कोटींची गुंतवणूक

  •  रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी २०२३ दरम्यान ५ जी नेटवर्कवर १.१२ लाख कोटी खर्च करतील, अशी शक्यता आहे.
  • भारती एअरटेलतर्फे २७-२८ हजार कोटींची गुंतवणूक शक्य आहे.
  • टेलिकॉम कंपन्या ५ जी अपग्रेडेशन व ऑपरेटिंग कॉस्ट आटोक्यात आणण्यासाठी रिचार्जचे दर वाढवतील.
  • भारती एअरटेलने हरियाणा व ओडिशात एन्ट्री लेव्हलच्या प्रीपेड प्लॅनचे दर ७५ टक्क्यांनी वाढवले आहेत.
  • रिलायन्स जिओकडून टॅरिफमध्ये १० टक्क्यांनी वाढ शक्य आहे.

दहा हजारांत मिळणार ५ जी स्मार्टफोन

१० हजार रुपयांपर्यंत ५ जी स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होईल. एकूण विक्रीत २० हजार रुपयांहून कमी किमतीच्या ५ जी स्मार्टफोनचा
वाटा ३१ टक्के असेल. नवीन वर्षात एकूण विक्रीत ५जी स्मार्टफोनचा वाटा ५४% असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news