Black & White Fungus : गाझियाबादमध्ये सापडला ब्लॅक, व्हाईट फंगसचा पहिला रुग्ण | पुढारी

Black & White Fungus : गाझियाबादमध्ये सापडला ब्लॅक, व्हाईट फंगसचा पहिला रुग्ण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चीन, अमेरिका आणि जपानसह इतर काही देशांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस भारतासाठी महत्वाचे ठरणार आहेत. यातच आता दिल्लीनजीकच्या गाझियाबादमध्ये ब्लॅक आणि व्हाईट फंगस (Black & White Fungus) झालेला पहिला रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे.

गाझियाबादमधील (Black & White Fungus) हर्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या या रुग्णाचे वय 55 वर्षे इतके आहे. ज्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त स्टेरॉईडस देण्यात आलेले असतात, त्यांच्यात ब्लॅक फंगस आढळून येतो. तर ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही, अशा लोकांना व्हाईट फंगस झालेला आढळून येतो. ब्लॅक फंगस डोळे आणि मेंदूला सर्वात जास्त प्रभावित करतो. तर व्हाईट फंगस किडनी, फुफ्फुस, आतडी, पोटाला प्रभावित करतो. ब्लॅक फंगसमुळे माणूस दगावण्याची शक्यता जास्त असते. याचा मृत्यूदर 50 टक्क्यांच्या आसपास आहे.

ब्लॅक फंगस अर्थात म्यूकरमायकोसिस हा वेगळ्या प्रकारचा फंगस आहे. दुसरीकडे व्हाईट फंगस हा सर्वसाधारण फंगस असून तो कोरोनाचे संकट येण्याआधीपासून आढळत होता. ज्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी असते, अशांना व्हाईट फंगस होऊ शकतो, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button