पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत आज (दि.३०) बंगालच्या हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express ) हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे (Vande Bharat Express) हावडा आणि न्यू जलपाईगुडी, ईशान्येकडील प्रवेशद्वार जोडले जाणार आहे. ही ट्रेन 564 किमीचे अंतर 7.45 तासांत कापणार आहे. या ट्रेनमुळे या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत तीन तासांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या अत्याधुनिक ट्रेनला 16 डबे असून बारसोई, मालदा आणि बोलपूर या थांब्यावर ट्रेन थांबणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आधुनिक प्रवासी सुविधांसह वंदे भारत एक्स्प्रेसला नियमित प्रवासी, उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये प्रवास करणारे पर्यटकांची या ट्रेनला मोठी पसंती मिळण्याची शक्यता आहे.
1. हावडा-न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेन 564 किमीचे अंतर 7.5 तासांत कापेल.
2. बारसोई, मालदा आणि बोलपूर हे तीन थांबे असतील –
3. हावडा-न्यू जलपाईगुडी वंदे भारत आठवड्यातून सहा दिवस धावेल.
4. ट्रेन हावडा स्टेशनवरून सकाळी 6 वाजता सुटेल आणि दुपारी 1.30 वाजता न्यू जलपाईगुडी स्टेशनला पोहोचेल. एक तासाच्या थांब्यानंतर, ट्रेन न्यू जलपाईगुडीहून दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि हावडा येथे रात्री 10 वाजता पोहोचेल.
5. वंदे भारत एक्सप्रेसची तिकिटे 1 जानेवारी 2023 पासून उपलब्ध होतील.
6. ईसी (एक्झिक्युटिव्ह क्लास) श्रेणीसाठी 2,825 रुपये आणि सीसी (चेअर कार) श्रेणीसाठी 1,565 रुपये शुल्क असेल.
7. रेल्वेच्या सूत्रांनुसार, 10 मोटरमन गाझियाबादला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी 25 ट्रेन परिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
8. वाराणसी-नवी दिल्ली, कटरा-नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, नवी दिल्ली-अंब अंदौरा, चेन्नई-म्हैसूर, बिलासपूर-नागपूर नंतर ही 7 वी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
9. अत्याधुनिक ट्रेनमध्ये ड्रायव्हरसाठी दोनसह 16 डबे आहेत.
हेही वाचलंत का?