‘ब्राह्मोस’च्या विस्तारित क्षमतेची यशस्वी चाचणी | पुढारी

‘ब्राह्मोस’च्या विस्तारित क्षमतेची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  भारतीय हवाई दलाने गुरुवारी ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित क्षमतेची यशस्वी चाचणी केली. बंगालच्या उपसागरात एसयू 30 एमकेआय या खास विमानातून लक्ष्यावर अचूक मारा करून क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य भेदले. सुखोई विमानाचे प्रक्षेपण ठरल्याप्रमाणे झाले आणि क्षेपणास्त्राने थेट बंगालच्या उपसागरातील लक्ष्यावर हल्ला केला.

हे क्षेपणास्त्र 450 कि.मी. लांब असलेल्या लक्ष्यालाही सहज भेदू शकते. हवेतून प्रक्षेपित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित क्षमतेमुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.

Back to top button