MP Rahul Shewale : खा. शेवाळेंनी आरोप केलेल्‍या तरुणीचे ट्विट चर्चेत, “मला न्याय हवा आहे …”

MP Rahul Shewale
MP Rahul Shewale

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी भारताची मुलगी आहे. मला न्याय हवा आहे. पण, माझ्यावर खासदार राहुल शेवाळे हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. ते मला बदनाम करत आहेत. ते फक्त भारतीय मुलीलाच बदनाम करत नाहीत तर ते भारताला सुद्धा बदनाम करत आहेत, असा आशयाचे व्हिडिओ ट्विट खा. शेवाळेंनी गंभीर आरोप केलेल्‍या पीडित तरुणीने केले आहेत. तसेच तिने अनेक धक्‍कादायक आरोपही शेवाळे यांच्‍यावर केले आहेत. 

महाराष्ट्रातील सत्तांतरा नंतरचं हे पहिलंच राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन. यंदाच हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहीलं आहे. त्यातील एक म्हणजे शिंदे गटाचे खा.राहुल शेवाळे यांच्यावरील अत्याचाराचे आरोप. त्यानंतर  राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 

MP Rahul Shewale :  राहुल शेवाळेंनी केले आरोप

बंड केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसदेमध्ये मी 'AU' हे  नाव घेतल्यामूळे हा कट रचण्यात आला आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला मी कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने मदत केली आहे. तिने मला व माझ्या कुटुंबीयांना वारंवार धमक्या दिल्या आहेत. या पाठीमागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हात आहे. माझ्यावर आरोप करणारी महिला डान्सबारमध्‍ये काम करते. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. ती सोशल मीडियावर पाकिस्तानी एजंटच्या मदतीने फेक अकाउंट  चालवलं. या अकाउंटवरुनच तिने मला पैशांची मागणी केली होती. माझ्यावर आरोप करणारी महिला ही दाऊद टोळीशी संबंधित आहे. या महिलेला राष्ट्रवादीचा हात आहे., असे आरोप नुकतेच राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केले होते.  यानंतर आता पीडित तरुणीने व्हिडिओ ट्विट खा. शेवाळेंनी गंभीर आरोप केले आहेत. 

मला न्याय हवा आहे

पीडित तरुणीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ ट्विट करत  म्‍हटलं आहे की, "मी भारताची मुलगी आहे. मला न्याय हवा आहे. पण, माझ्यावर खासदार राहुल शेवाळे हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. ते मला बदनाम करत आहेत. ते फक्त भारतीय मुलीलाच बदनाम करत नाहीत तर ते देशालही बदनाम करत आहेत.  माझे संबंध दाऊद, पाकिस्तानशी आहे. असे आरोप करुन त्यांना त्यांचे  गुन्हे लपवायचे आहेत. त्यांनी माझ्यावर  माझ्यावर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. वेळोवेळी शारिरीक मानसिक अत्याचार केले आहेत."

लग्नाचं वचन देऊन रिलेशन

पीडित तरुणीने या व्हिडीओमध्‍ये म्‍हटलं आहे की,"साकीनाका पोलिसांकडे मी खासदार राहुल शेवाळे यांच्‍या विरुद्ध तक्रार करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र राजकीय दबावापोटी माझी तक्रार दाखल करुन घेतली नाही. माझ्या जीवाला धोका आहे. मला दोनवेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दोन खोट्या केसेसही दाखल केल्या आहेत. माझ्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्‍यानंतर माझ्यावर खोटे आरोप करण्‍यात आले. लग्नाचं वचन देऊन आमचं नात सुरु झालं होतं. दोन वर्षे राहुल शेवाळे माझ्यासोबत कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते. या दरम्यान त्‍यांनी मला दारु पिऊन मानसिक व शारीरिक  त्रास दिला. लग्नावरुन विचारलं असता, त्‍यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली. तसेच खोट्या तक्रारी दाखल केल्‍या. 

तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड चेक करा

पीडित तरुणीने आणखी एका  व्हिडिओमध्‍ये म्‍हटलं आहे की,माझं करिअर हे दुबईमध्ये झालं. तिथे माझी कंपनी आहे. माझे वेगवेगळ्या देशातील मित्र आहेत. ते भारत, अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश आदी देशातील आहेत. यावरुन माझे पाकिस्तानी एजंटाशी संबंध आहेत, हा आरोपच बिनबुडाचा आहे. आपले गुन्हे लपविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे निराधार आरोप करत आहेत. या देशाची मुलगी न्याय मागत आहे. मला न्याय हवा आहे."

'एनआयए'ने माझे कॉल रेकॉर्ड तपासावे

पीडितेने पुढे म्‍हटलं आहे की, "माझे जर पाकिस्तान एजंट आणि दाऊदशी संबंध असतील तर मी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेला (एनआयए)  विनंती करते, की  माझे कॉल रेकॉर्ड चेक करावे. माझा पासपोर्ट तपासावा. मी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एकएक कॉपी पाठवते.  मी दोन वेळा कराचीला गेली आहे. माझा पासपोर्ट चेक करा. मी दुबईतही तक्रार केली, तिथेही खासदार शेवाळे यांनी मला अटक करायला लावली. मी  जेलमध्ये होते, आता सुटून आले, तर इथेही मला त्रास देण्यात आला  आहे."

माझ्या भेटीनंतर कुठे जायचे हे तपासा

पीडिता व्हिडिओ ट्विटमध्ये म्हणतं आहे की, "राहुल शेवाळे मला दुबईला भेटायला यायचा. मला भेटल्‍यानंतर ते कुठे- कुठे जायचे, किती वेळा पाकिस्तान आणि  कराचीला गेले आहेत. हे सर्व तपासा. त्‍यांचे कोणकोणते व्यवसाय आहेत, कोणाकोणाशी संबंध आहेत. त्‍यांच्‍याकडे  असलेला पैसा कुठून आला, याचीही सखोल चौकशी करा. मला न्याय हवा आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे".

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news