हिंदूंनी घरात शस्त्रे ठेवावीत; खा. प्रज्ञा ठाकूर यांचे वादग्रस्त विधान | पुढारी

हिंदूंनी घरात शस्त्रे ठेवावीत; खा. प्रज्ञा ठाकूर यांचे वादग्रस्त विधान

शिमोगा; वृत्तसंस्था :  हिंदूंनी घरात शस्त्रे ठेवावीत. कारण कधी कसली परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही, असे वक्तव्य भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. कर्नाटकातील शिमोगा येथे त्या हिंदू जागरण वैदिकच्या दक्षिण विभागीय वार्षिक परिषदेमध्ये बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, तमाम हिंदू बांधवांनो, तुम्ही आपल्या घरात शस्त्रे ठेवा. बाकी काही नाही तर भाजी कापण्यासाठी धारदार चाकू ठेवा. कारण कधी कोणती परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येणार नाही. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button