पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत बायोटेक कंपनी लवकरच नाकाद्वारे कोविडचा बूस्टर डोस लॉन्च करणार आहे. भारतातील पुढील व सावधगिरी बाबतच्या डोससाठी ही नवी पद्धत अवलंबली जाणार आहे. भारत बायोटेक ही कंपनी जी कोवॅक्सिनचा उत्पादक आहे. आवश्यक त्या कार्यालयीन मंजुरीनंतर नाकाद्वारे हा बूस्टर डोस देण्यास सुरुवात होईल. (Third Nasal Booster Dose)
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या डोसची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही लस COWIN प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केली जाऊ शकते. नाकाद्वारे देण्यात येणारा बुस्टर डोस हा भारतातील अशा प्रकारचा पहिला बूस्टर डोस असणार आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हा डोस दिला जाईल, अशी प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर या लसीची किंमत लवकरच ठरवली जाईल असे ही सांगण्यात येत आहे. (Third Nasal Booster Dose)
हेही वाचा