Stock Market Today : सेन्सेक्स 635 तर निफ्टीमध्ये 186 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Stock Market Today : सेन्सेक्स 635 तर निफ्टीमध्ये 186 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील चढ-उतार सुरूच आहेत. दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजारपेठेत तेजी आली होती. पण आज (दि. 21) बाजार खुला होताच विक्रीचा दबदबा राहिला. बुधवारी सेन्सेक्स 635.05 (1.03%) अंकांनी कोसळून 61,067.24 अंकांवर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी देखील 186.20 (1.01%) अंकांनी घसरून 18,199.10 वर बंद झाला.

सेन्सेक्स आणि निफ्टीने आजच्या व्यवहारात जोरदार सुरुवात केली, पण नंतर घसरण झाली. आयटी स्टॉक्स आणि फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार विक्री दिसून आली. निफ्टीवरील आयटी निर्देशांक 0.40 टक्के आणि फार्मा निर्देशांक 2.5 टक्क्यांनी मजबूत झाला. तर बँक, वित्तीय आणि वाहन निर्देशांक 1.5 टक्क्यांहून अधिक घसरले. मेटल आणि पीएसयू बँक निर्देशांक 2.5 टक्के आणि 3 टक्क्यांनी घसरले. रियल्टी इंडेक्स 2 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे आज सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी कमजोर झाला. तर निफ्टी 18200 च्या खाली बंद झाला.

एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन म्हणाले की, चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे बाजारातील गुंतवणूकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हेल्थकेअर, आयटीसह क्षेत्रीय निर्देशांक रेड मार्कमध्ये बंद झाले. उद्याही बाजारात आणखी चढ-उतार पाहायला मिळतील. बाजार आणखी खाली जाऊ शकतो, असे त्यांनी मत मांदले.

या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Divis Labs- 4.99 टक्के
  • Apollo Hospital- 3.69 टक्के
  • Cipla- 3.38 टक्के
  • Sun Pharma- 1.75 टक्के
  • HCL Tech- 1.03 टक्के

या शेअर्समध्ये घसरण झाली

  • Adani Enterpris- 6.32 टक्के
  • Adani Ports- 3.01 टक्के
  • IndusInd Bank- 2.19 टक्के
  • Bajaj Finserv- 2.10 टक्के
  • UltraTechCement- 2.08 टक्के

सेन्सेक्स 304 अंकांनी वधारला होता, पण…

आजच्या व्यवहारादरम्यान, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक 304.17 अंकांनी वाढून 62,006.46 अंकांवर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 88.05 अंकांनी वाढून 18,473.35 वर गेला. किंबहुना, जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि आयटी समभागांमध्ये खरेदी यामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वाढले. या कालावधीत सेन्सेक्समध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, विप्रो, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा समावेश होता.

आजच्या टॉप गेनर्समध्ये SUN PHARMA, HCL TECH, TECHM, TCS, Infosys, WIPRO यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक नुकसान INDUSINDBK, MARUTI, TATA MOTORS, AXIS BANK, BAJFINANCE, SBI आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news