महिलेच्या पोटात 15 कोटींचे ड्रग्ज; दिल्ली विमानतळावर अटकेनंतर शस्त्रक्रिया | पुढारी

महिलेच्या पोटात 15 कोटींचे ड्रग्ज; दिल्ली विमानतळावर अटकेनंतर शस्त्रक्रिया

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  ड्रग्ज तस्कर तस्करीचे नवनवीन प्रयोग करत असल्याचे दिल्ली विमानतळावर उघडकीला आले आहे. एका महिलेच्या शरीरातून 15 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. कॅप्सूलच्या स्वरूपातील हे कोकीन चर्चेचा विषय ठरले आहे. नार्कोटिक्स, कस्टम तसेच सुरक्षा दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

महिला न्यू गिनीची रहिवासी आहे. कोकीनचे 82 कॅप्सूल तिच्या शरीरातून काढण्यात आले आहेत. महिलेला कारवाईचा संशय येताच तिने हे सारे कॅप्सूल गिळून टाकले होते. राम मनोहर लोहिया रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करून हे सारे कोकीन जप्त करण्यात आले आहे.

Back to top button