विकासाला मारक असलेल्यांना ईशान्य भारताने रेड कार्ड दाखविले : पंतप्रधान मोदी | पुढारी

विकासाला मारक असलेल्यांना ईशान्य भारताने रेड कार्ड दाखविले : पंतप्रधान मोदी

शिलाँग; वृत्तसंस्था :  फुटबॉलमध्ये खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध वर्तन करणार्‍याला रेड कार्ड दाखवून बाहेर केले जाते. गेल्या 8 वर्षांत ईशान्य भारताच्या विकासाला मारक ठरणार्‍या घटकांना आमच्या सरकारने व स्थानिक जनतेने मिळून रेड कार्ड दाखवले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

अरुणाचलातील तवांगमधील भारत-चीन चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच ईशान्य भारताच्या दौर्‍यावर पोहोचले. नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त शिलाँगमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मोदी या भागातील पारंपरिक पेहरावात सहभागी झाले.
भ—ष्टाचार, भेदभाव, घराणेशाही, हिंसाचार, प्रकल्पांत अडथळे निर्माण करणे व मतपेटीचे राजकारण हे सारे हद्दपार करण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वजण मिळून हे वाईट घटक मुळासकट उखडून टाकू, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा आदी यावेळी उपस्थित होते.

­­

Back to top button