भुट्टोंची मोदींवरील टीका ही नीचतम पातळी : भारत | पुढारी

भुट्टोंची मोदींवरील टीका ही नीचतम पातळी : भारत

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या 126 कुख्यात दहशतवाद्यांसह, नरसंहार घडविणार्‍या 27 दहशतवादी संघटनांना आमच्या देशात अभय आहे, असा अभिमान पाकिस्तानशिवाय जगाच्या पाठीवरील कोणताही बाळगू शकत नाही. विकृतीच्या अशा अनेक नीचतम पातळ्या पाकिस्तानने आजवर गाठल्या आहेत. पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली अभद्र टीका ही पाकिस्तानची आणखी एक नीचतम पातळी आहे, असे जोरदार प्रत्युत्तर भारताने दिले आहे.

दहशतवाद हे ज्या देशाचे थेट धोरण आहे, त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याने भारताच्या पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह विशेषण वापरणे अशोभनीय आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या मुख्य सूत्रधारांवर हा सारा उद्वेग भुट्टो यांनी काढायला हवा होता. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला हुतात्मा म्हणणार्‍या पाकिस्ताने; लादेनसह लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब—ाहिमसारख्या कुख्यात दहशतवाद्यांना शरण देणार्‍या पाकिस्तानने अजूनही आत्मचिंतन करावे, अशी कानउघाडणी भारताचे परराष्ट्र सचिव अरिंदम बागची यांनी केली आहे.

Back to top button