India-China clash : चीनच्या कुरापतीवर संरक्षण मंत्र्यांनी दिली संसदेत माहिती... | पुढारी

India-China clash : चीनच्या कुरापतीवर संरक्षण मंत्र्यांनी दिली संसदेत माहिती...

पुढारी ऑनलाइन डेस्क – India-China clash : चीनी सैन्याने अरुणाचल येथील तवांग सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले. तर या चकमकीत एकही भारतीय सैनिक शहीद झालेला नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत अधिवेशनाच्या वेळी उत्तर दिले.

India-China clash : अरुणाचल प्रदेशच्या तवंगमध्ये झालेल्या भारत-चीन लष्कराच्या धुमश्चक्रीनंतर विपक्षने या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. तर विरोधी पक्षाने प्रधानमंत्री मोदींकडून यावर उत्तर मागितले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सस्पेंशन ऑफ बिजनेस नोटीस दिली आहे. राजनाथ सिंह संसदेत बोलत असताना संसेदत विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली.

India-China clash : सिंह यांनी संसदेत स्पष्ट केले की, तवांग सीमेवर चीनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. मी या सभागृहाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक मरण पावला नाही किंवा कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सच्या वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे, पीएलए सैनिक त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी माघारले: संरक्षण मंत्री

तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यामध्ये सीडीएस सह तीन्ही दलांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला होता. दरम्यान या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही.

हे ही वाचा :

मंचर : सोन्याच्या बिस्किटाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरले

India-China Clash : तवांगमधील भारत-चीन धुमश्चक्रीवर थोड्याच वेळात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत उत्तर देणार

Back to top button